Sunday, 8 May 2016

8 MAY 2016 MATRU DIWAS

आई.... म्हणजे काय... शब्दात लिहा..
GlobalMarathi
Thursday, May 06, 2010 AT 12:00 AM (IST)
नऊ मे मातृदिनाच्या निमित्ताने...
माझी  भावना .... तुमचीही मांडा.....


खरच. स्पर्शातली जादू कुणाजवळ असेल ?
उत्तर एकच... आई !
ममता,माया आणि खरा आपलेपणा
ओलाव्याचा तो स्पर्श
अनेक समस्यांवरचा तो एकच उपाय
आईचा मायेचा स्पर्श !
आईशी भांडलो.. अबोला धरला
पोट बरोबर नव्हते तेव्हा आईने पोट चोळण्यासाठी हात फिरवला
आणि काय आश्‍चर्य इतके छान वाटले की बरे वाटायला लागले.
वय झाले .आकाराने वाढलो.
नोकरीत पद मिळाले
तरी आईच्या त्या हातातील जादूई स्पर्शाने ती किमया घडविली.

लहान होतो पण वजनही भरपूर होते.
सतत कुठेतरी पडायचो.
हाताला,पायाला जखम व्हायची.
एकदा तर रोज दवाखान्यात न्यावे लागायचे.
आईच्या कमरेवर स्वार होउन पट्टी करायसाठी जावे लागायचे.
त्या आठवणी आजही ताज्या होतात.

पुरणपोळी,बेसनाचे लाडू,करंज्या खाव्या तर आईच्या हातच्याच
आज बायको घरी सारे करते.
पण तो स्पर्श नाही. ती चव नाही.
पदार्थात काय किती घातले
यापेक्षा मन आणि आपलेपणाचे तिखट-मिठ आणि साखर जी आईने त्यात मळली त्याला
तोड नाही.

आजही तीची आठवण होते
मन जाते भूतकाळात,रमतो मी स्पर्शात.
आईच्या त्या आठवतातून काळ उमटतो.
गरीबी दिसते पण टोचत नाही.
मिलोची भाकरी आणि पातळ आमटीत निवडून घ्यावेत अशीच डाळ असायची
पण त्या भाकरी-आमटीची चव कशालाच येणार नाही.
हे घडते त्याची किमयागार म्हणजे आई.
त्या मातेला वंदन,
तीच्या आठवांची सोबत आणि तीच्या स्पर्शाची महती
सारेच आनंददायी आणि अगणतीत असेच.
आई,आज नाही.पण मनात ..घराघराच्या चराचरात भरून राहिली आहे.
माते तुझ्या कुशीत मी धन्य झालो.

तुम्ही तुमची भावना येथे प्रकट करा.
http://www.globalmarathi.com/GlobalMarathi/pressrelease.aspx


आई माझा गुरु,
आई कल्पतरू
सुखाचा सागरू आई माझी,
प्रीतीचे माहेर, शांतीचे आगर
मांगल्याचे
सार, आई माझी...
असे आईचे यथार्थ वर्णन करणारा आणि 'स्वामी तिन्ही
जगाचा आईविना भिकारी' या उक्तीची मनामनात साक्ष देणारा चित्रपट श्यामची आई.

About 36,200 results (0.42 seconds) 
    Stay up to date on results for aai marathi lekh.
    Create alert

    About 33,400 results (0.53 seconds) 
    Kharghar, Navi Mumbai, Maharashtra - From your Internet address - Use precise location
     - Learn more   















    No comments:

    Post a Comment