Sunday 26 June 2016

20 JUN HISTORY TODAY

२० जून दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | २० जून २०१३
२० जून दिनविशेष(June 20 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
चंद्रकांत रघुनाथ गोखले - (जानेवारी ७, इ.स. १९२१, मिरज, सांगली संस्थान - जून २०, इ.स. २००८, पुणे, महाराष्ट्र) हे मराठी नाट्यअभिनेते व चित्रपट अभिनेते आणि गायक होते.

जागतिक दिवस


  • ध्वज दिन : आर्जेन्टिना.

ठळक घटना, घडामोडी


  • १६३१ : आयर्लंडमधील बाल्टिमोर शहर अल्जीरियाच्या चाच्यांनी लुटले.
  • १७५६ : कोलकाताचा फोर्ट विल्यम हा ब्रिटीश किल्ला जिंकल्यावर बंगालच्या नवाब सिराज उद् दौलाने ब्रिटीश सैनिकांना तुरुंगात डांबले.
  • १७८२ : अमेरिकेच्या कॉँग्रेसने राष्ट्रमुद्रा ठरवली.
  • १७८९ : पॅरिसमध्ये सुमारे ५०० लोकप्रतिनिधींनी टेनिस कोर्टवरील शपथ घेतली व फ्रेंच क्रांतीला बळ दिले.
  • १७९१ : फ्रेंच क्रांतीत आपले मरण असल्याचे ओळखून फ्रेंच राजघराण्याने व्हारेनला पळ काढण्याचा प्रयत्न सुरू केला.
  • १८३७ : व्हिक्टोरिया इंग्लंडच्या राणीपदी.
  • १८६२ : रोमेनियाचा पंतप्रधान बार्बु कटार्जुची हत्या.
  • १८६३ : वेस्ट व्हर्जिनीया अमेरिकेचे ३५वे राज्य झाले.
  • १८७७ : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलने कॅनडातील हॅमिल्टन शहरात व्यापारी तत्त्वावर चालणारा प्रथम दूरध्वनी बसवला.
  • १९१९ : मायाग्वेझ, पोर्तोरिको येथील तियात्रो याग्वेझ या नाट्यगृहाला आग. १५० ठार.
  • १९२१ : पुणे येथे टिळक महाराष्ट्र विद्यापिठाची स्थापना.
  • १९५६ : व्हेनेझुएलाचे सुपर कॉन्स्टेलेशन प्रकारचे विमान अमेरिकेच्या ऍस्बरी पार्क, न्यू जर्सी शहराजवळ समुद्रात कोसळले. ७४ ठार.
  • १९६० : मालीला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
  • १९६० : सेनेगालला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
  • १९६९ : जॉक शबान-देल्मास फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
  • २००१ : परवेझ मुशर्रफ पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी.

जन्म, वाढदिवस


  • १००५ : अली अझ-झहीर, खलिफा.
  • १५६६ : सिगिस्मंड तिसरा, पोलंडचा राजा.
  • १६३४ : चार्ल्स इमॅन्युएल, सव्हॉयचा राजा.
  • १८६० : जॅक वॉराल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू, फुटबॉलपटू व प्रशिक्षक.
  • १८६९ : लक्ष्मणराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समुहाचे संस्थापक.
  • १९३९ : रमाकांत देसाई, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९४६ : जनाना गुस्माव, पूर्व तिमोरचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४८ : लुडविग स्कॉटी, नौरूचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९५४ : ऍलन लॅम्ब, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९७२ : पारस म्हाम्ब्रे, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ४५१ : थियोडोरिड, व्हिझिगॉथ राजा.
  • ८४० : भक्त लुई, फ्रँक राजा.
  • १६६८ : हाइनरिक रॉथ, जर्मनीचा संस्कृत भाषाप्रवण.
  • १८३७ : विल्यम चौथा, इंग्लंडचा राजा.
  • १९१७ : जेम्स मेसन क्राफ्ट्स, अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
  • १९९७ : बासू भट्टाचार्य, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
  • १९९७ : वासुदेव वामन पाटणकर ऊर्फ भाऊसाहेब पाटणकर, मराठीतील प्रथम शायर.
  • २००८ : चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट व चित्रपट अभिनेता.













No comments:

Post a Comment